विनायक मेटेंच्या अपघात हा चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली . मात्र गंभीरबाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मु़ंबई व रायगड पोलिस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. मात्र एक प्रवासी मदतीसाठी थांबला. मात्र ही यंत्रणा चुकीची आहे.
विनायक मेटेंच्या अपघातानंतर पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर वाढत्या अपघातांकडे लक्ष वेधले गेले आहे. भविष्यात काही अपघात घडल्यास त्या ठिकाणी तात्काळ मदतीसाठी लोकेशन मिळण्या करता पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टिम प्रणाली बसवली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते जाणात नाही.
लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई केली जाईल. अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होते अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अशी यंत्रणा उभी करणे गरजेचे असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी सभागृहात दिली. आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे कारण अपघात होण्याची शक्यता असते.