बेळगांव महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज (सोमवार) सकाळी बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बसवराज नालतवाड यांनी या रस्त्यावर भरणाऱ्या 22 शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.वारंवार याचा परिसरात बिबट्या नागरिकांना निदर्शनास येत असल्याने रात्रीची गस्त वाढविण्याची तयारी वनखात्याने केली आहे.
बेळगावातील गोल्फ मैदान आणि पर्यावरण पार्कमध्ये गेली महिनाभर बिबट्याचे अधूनमधून दर्शन होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . सहाच्या सुमारास एका वाहनचालकाला बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे पुन्हा या परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव शहरातील 12 आणि ग्रामीण भागातील 9 शाळांचा समावेश आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पोलीस आणि वनविभागाच्या सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांकडून हा परिसर पिंजून काढण्यात येत आहे. मात्र बिबट्याचे ठसेही आढळले नाहीत. त्यामुळे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.कारमधून जात असताना गोल्फ मैदान जवळील गांधी चौकाजवळ बिबट्या निदर्शनास आला. कारचा आवाज ऐकताच बिबट्या जवळच असणार्या संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन पुन्हा गोल्फ मैदान परिसरात गेला असल्याचे अजय मास्ती यांच्याकडून सांगण्यात येत आहे.