मुंबई प्रतिनिधी | विनायक मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी छत्रपती संभाजी राजे यांनी मेटे कुटुंबियांचे सांत्वन केले. शिवसंग्राम संघटने’ला राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल. राजकीय पाठबळ मिळाल्यास त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना राज्यपाल प्रणित किंवा इतर कोट्यातून आमदारकी द्यावी, असे मत संभाजी राज्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घ्यावी. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा,
मराठा आरक्षणाकरता विनायक मेटे लढले त्यांचे दुर्दैवी निधन झाले. एक प्रकारे ते समाजाच्या प्रश्नांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि समाज प्रश्नांवर शहीद झाले. त्यांच्या निधनाने मेटे कुटुंबीयांसह शिवसंग्राम आणि मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, अशा शब्दात संभाजीराजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.मेटे कुटुंबाशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी विनायक मेटेंशी असलेल्या जिव्हाळ्याचा संदर्भ देताना आपण कोणत्याही अडचणीत मेटे कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे.