जळगाव : प्रतिनिधी
खानदेशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात असल्याची धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंना केला आहे. आ.खडसेंनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तसेच या चेक नाक्यावरील प्रकाराबाबत विधान परिषदेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ चेक पोस्ट नाक्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहनचालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी वाहनं असतात. अशावेळी त्यांच्याकड एकादा कागदपत्र कमी असला, तर त्यांच्याकडून वसुली केली जाते. ही बाब एकनाथराव खडसे यांना सांगण्यात आली. खडसे हे लगेच चेकपोस्टवर गेले. त्याठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. या नाक्याची चौकशी ही वरिष्ठ पातळीवर झाली पाहिजे. याठिकाणी किती वसुली केली जाते. त्याचा वाटा कुणाकुणाला मिळतो. यावर वचक कसा बसविता येईल. यासाठी आता एकनाथराव खडसे आक्रमक झाले आहेत.