Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बिबा नगरातून घरातून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
    क्राईम

    बिबा नगरातून घरातून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली; जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 21, 2022Updated:August 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहरातील बीबा नगर येथील घरात शनिवार २० ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातून दागिण्यांसह रोकड असा एकूण ४३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बीबानगर येथे प्रमिला सुधाकर चौधरी वय ५६ या वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी घराचा मागच्या खोलीचा रुमचा लोखंडी व लाकडी दरवाजे उघडे ठेवून प्रमिला चौधरी या झोपल्या होत्या. पहाटे १ ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरट्याने घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधत घरातील ११ ग्रॅमचा सोन्याचा हार, ३ ग्रॅमचे कानातले, ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, १० ग्रॅमचा चांदीचा शिक्का, १०० ग्रॅमच्या चांदीच्या पायातल्या साखळया, व ६०० रुपये रोख असा एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सकाळी उठल्यानंतर प्रकार लक्षात आल्यानंतर प्रमिला चौधरी यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.