उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. यावेळी फेसबुकवर मेसेजद्वारे पोस्ट टाकून शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिरच्छेद करणाऱ्याला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. तसेच ज्या फेसबुक पेजवरून सीएम योगी यांना धमकावण्यात आले आहे, त्यांचे नाव आत्मा प्रकाश असून यांनी स्वत: पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस विभागासह इंटेलिजन्स युनिट आणि जेडो विभागही सक्रिय झाला आहे. आत्मा प्रकाश नावाच्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते, त्यानंतर मुरादाबाद पोलिस नावाचे फेसबुक पेज तयार करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शिरच्छेद करण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय शिरच्छेद करणाऱ्याला 2 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले आहे. मुरादाबाद सायबर सेलची मदत घेतली जात आहे. आत्माप्रकाश पंडित यांच्या नावाने बनवलेल्या या खात्याच्या तपासात सायबरसेलला अनेक प्रतिमा सापडल्या. ज्यावर मुरादाबाद जिल्ह्याच्या डीएमचा फोटो, योगी आदित्यनाथ यांचा फोटो, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान यांचा फोटो आणि पाकिस्तानचा ध्वज डीपीवर लावण्यात आला आहे.