Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन
    राज्य

    डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

    editor deskBy editor deskAugust 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    राम टोटल बॉडी चेकअप सेंटरचे संचालक डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” या कामजीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत “सेक्सोलॉजी” विषयावरील राष्ट्रीय परिषदेत एका हॉटेलमध्ये झाले. या पुस्तकामुळे कामजीवनातील अनेक समज, गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हे पुस्तक डॉक्टर, विद्यार्थांना अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शक व सर्वसामान्यांसाठी देखील मोलाचे ठरेल,असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला.

    या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सोलॉजिस्ट चेन्नईचे डॉ.नारायण रेड्डी, मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.राज ब्रम्ह्नभट , हैद्राबादचे डॉ.व्यंकट रामण्णा, नागपूर येथील डॉ.संजय देशपांडे, कोल्हापूर येथील डॉ.राजसिंह सावंत आदींच्या मुख्य उपस्थितीत झाले.

    या परिषदेत स्त्री – पुरुषांमध्ये असमधनाता, नसांची कमजोरी, शीघ्रपतन, समलिंगी आकर्षण, लिंगरोपण, हर्निया, हायड्रोसील, इंद्रियाची पुढील कातडी चिकटणे आदी विषयांवर चर्चा झाली. डॉ.प्रभू व्यास यांनी “फॅक्टर अक्सलेरेटिग अँड डीप्रेसिंग पिनाईल इरेशन अँड प्रिमॅच्युअर इजाकुलेशन” (ताठरता येणे, न येणे व शीघ्रपतन) या विषयावर संशोधन केले. या संशोधनामुळे अनेकांच्या मनातील शंकाचे निरसन होऊन त्यांचे वैवाहिक कामजीवन सुखी, समाधानी आणि संबंधितांना संतती प्राप्तीसाठी मदत होऊ शकते, असे डॉ.प्रभू व्यास यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचा थरार : पोस्टरबाजीने चिघळला राजकीय संघर्ष !

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.