राज्यात पावसाचा जोर वाढणार असून आता राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील निमकराळ येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २० ऑगस्स्ट रोजी घडली. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विजांच्या गडगडाटासह वादळी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
जळगाव येथील निमकराळ भागातील आडोळ, मांडवा, तिवडी, गीलखेड, दादुलगाव या परिसरात शनिवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सध्या शेतातील कामे सुरू असल्याने निमकराळ येथील अमोल रघुनाथ पिसे (वय २२ वर्ष ) मधुकर तुळशीराम उगले (वय ५६ वर्ष) आणि त्यांच्या पत्नी यमुना मधूकर उगले (वय ४८ वर्षे) तीघेही शेतात काम करत होते. जोरदार पाऊस आणि विजांच्या कउकडाटा झाल्याने तिघेही शेतातील झाडाखाली उभे होते. त्या झाडावर विज पडली झाडाखाली असलेल्या अमोल पिसे आणि मधूकर उगले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर यमुना उगले या गंभीर जखमी झाल्या आहेत.