कोरोनाची लाट ओसरता आता ठाण्यात स्वाइन फ्लूचं संकट ओढावलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. तर ठाण्यात तब्बल 400 रुग्णांची वाढ झाली आहे. . राज्यात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने हाहाकार माजला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यापासून मुंबईसह महाराष्ट्रात स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होता ना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यालाही स्वाइन फ्लूने घेतला आहे. ठाण्यात गेल्या महिन्याभरापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आतापर्यंत 400 रुग्ण आढळून आले आहे.
मागील 15 दिवसांमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईमध्येही 138 रुग्ण आढळून आले आहे. . ठाण्यात जुलैमध्ये 20 जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाली होती. स्वाइन फ्लूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये, यासाठी महापालिका यंत्रणांनी नागरीकांना सजग केले असतानाच आता शहरात स्वाईन फ्ल्यूचे संकट ओढवले आहे.