हिमाचल प्रदेशातील रायपूर-कुमालदा परिसरात तसेच मंडी जिल्ह्यात अन्य ठिकाणी शनिवारी पहाटे ढगफुटी झाली. त्यामुळे विविध भागात महापूर, भूख्खलन आणि अपघातामध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे उत्तराखंडच्या विविध भागात ढगफुटीच्या मालिकेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर १० जण बेपत्ता झाले.
नदीचे किनारे फुटले आणि पूल वाहून गेले, नदीच्या काठावरील प्रसिद्ध शिवमंदिर असलेल्या टपकेश्वराच्या गुहेतही पाणी शिरले. ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत १३ जण मरण पावल्याचे सांगितले जात आहे. सॉन्ग नदीवरील पूल वाहून गेला आणि मसुरीजवळील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलसेल्या केम्पटी फॉल्स धोकादायक रीतीने वाहू लागला आहे. ढगफुटीने खेड्यांतील घरांमध्ये चिखल व पाणी घुसले. ज्यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने बाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले.
उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळे हानी वित्त आणि जीवित हानी झाली आहे. बाधित गावांमध्ये मालदेवता, भुत्सी, तौलियाकाटल, थाट्युड, लवरखा, रिंगलगड, धुत्तू, रगड गाव आणि सरखेत यांचा समावेश आहे. बाधित रहिवाशांना शाळा आणि पंचायत इमारतींमध्ये हलवण्यात आले आहे. ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग तोताघाटी येथे, ऋषिकेश-गंगोत्री महामार्ग नागनी येथे रोखण्यात आला आहे.