शिंदे-फडणवीस सरकारने दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यास परवानगी दिली. त्यावेळी, दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश केला असून, गोविंदांना आता क्रीडा कोट्यातील ५ टक्के शासकीय नोकरीत आरक्षणचा लाभही मिळणार असल्याचं सांगितलं. अजित पवार यांनी सरकारच्या प्रो-गोविंदाच्या निर्णयावरुन शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच फटकारले आहे.
अजित पवार अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी भावनिक निर्णय घ्यायाचा नसतो, अशा शब्दात त्यांनी आपलं मत मांडलं. जिल्ह्यातील मेळघाट, धारणी या आदिवासी भागाला ते भेट देताऐ, यावेळी दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरिल विचारावर त्यांनी भूमिका मांडली.
मला विम्याचा मुद्दा पटला. मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांचा विमा देण्याची घोषणा सरकारने केली. कायमचं अपंगत्व आलं तर ५ लाख रुपये मदत समजू शकतो. नोकरी मिळण्यासाठी आम्ही आयुष्यभर केवळ अभ्यासच करायचा का? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सरकारला सोशल मीडियात ट्रोल केलं. १३ कोटी जनतेला साधारण काय वाटतं, याचाही विचार करायचा असतो, असंही पवार म्हणाले.