• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महागठबंधन सरकार बरखास्त करा

उच्च न्यायालयात याचिका दाखल

editor desk by editor desk
August 20, 2022
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
महागठबंधन सरकार बरखास्त करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्यानं स्थापन झालेलं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे. विरोधी पक्षांच्या राजकीय भाषणबाजीनंतर, हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलंय.

सरकार स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तोच सरकार बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागलीय. यासाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. असंवैधानिक मार्गानं स्थापन झालेलं हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी फिर्यादीनं न्यायालयाकडं केलीय.

याचिकाकर्त्यानं 2017 मध्ये आरजेडी सोडल्यानंतर आणि भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आरजेडी आणि तेजस्वी यादव सरकारला जनादेश चोरण्यास सांगत होते, याची आठवण करून दिलीय. याच आधारावर नितीशकुमार यांचं सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळं कलम १६३ आणि १६४ नुसार राज्यपालांनी नितीश कुमार यांची पुनर्नियुक्ती करू नये. कारण, बहुसंख्य आघाडी सोडून नितीश कुमार यांनी अल्पसंख्याक आघाडीसोबत सरकार स्थापन केलं आणि ते मुख्यमंत्री झाले आहेत, असंही याचिकेत नमूद करण्यात आलंय.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सामाजिक कार्यकर्त्या धर्मशीला देवी आणि अधिवक्ता वरुण सिन्हा यांच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात आलीय. त्याला जनहित याचिका म्हटलंय. याचिकेत म्हटलंय की, 2020 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीत एनडीएचे नेते म्हणून आपली उपस्थिती दर्शवली आणि त्यांना एनडीएच्या (NDA) नावावर बहुमत मिळालं. आता नितीशकुमार महागठबंधनचा घटक पक्ष बनून मुख्यमंत्री झाले आहेत. हे संसदीय लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत रचनेच्या विरोधात आहे.

Previous Post

आदित्य ठाकरे यांच्या नियोजित सभेत पाकीटमार चोरटा पकडला

Next Post

गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?

Next Post
गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?

गणपतीसमोर चित्रपटाची गाणी कसली लावता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !
राजकारण

स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव !

July 16, 2025
कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
कृषी

कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !

July 16, 2025
“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !
राजकारण

“सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष ; युतीबाबत ठाकरेंचे उत्तर !

July 16, 2025
मोठी बातमी :  जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !
राजकारण

मोठी बातमी : जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर !

July 16, 2025
विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू !

July 16, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जळगावात शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याने दोघांना लोखंडी पाईपने मारहाण !

July 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group