Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकाला पकडले
    क्राईम

    सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकाला पकडले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 25, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल ;– तालुक्यातील अट्रावल सांगवी शिवारातून बैलाची चोरी करतांना एकाला शेतकऱ्याने पकडले आहे. यावल पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

    चंद्रकांत विजय तावडे (वय-३५) रा. डोंगर सांगवी ता. यावल हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बैलजोडी आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी त्याचा २० हजार रूपये किंमतीचा बैल अट्रावल सांगवी शिवारातील शेतात बांधले होते. अट्रावल गावातील किरण दिनकर कोळी याने बांधलेला बैल चोरून नेत असतांना त्याला रंगेहात पकडले आहे. शेतकऱ्यांनी त्याला चांगला चोप देवून यावल पोलीसांच्या हवाली केले आहे. चंद्रकांत तावडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी किरण कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अशोक जवरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाचोऱ्यातील महिलेची ८.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

    February 12, 2026

    धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला

    February 12, 2026

    मोठी बातमी ; मंत्री मंत्री एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल !

    February 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.