Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दाम्पत्याला जंगलात नेत लुटले ; सहा आरोपी अटकेत
    क्राईम

    दाम्पत्याला जंगलात नेत लुटले ; सहा आरोपी अटकेत

    editor deskBy editor deskAugust 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : प्रतिनिधी

    लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेत मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा ऐवज जबरी लुटून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत सहा जणांना अटक केलीय.

    पंकज रामसिंग राठोड (वय-२१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे जवळ बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी थांबला. याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७/८ अनोळखी जणांनी दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. यानंतर राठोड यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने व बाराशे रूपयांची रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरी चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सात संशयित आरोपींना मुक्ताईनगर पोलीसांनी अटक केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026

    तरुणीकडे लग्नाची मागणी करत केला विनयभंग !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.