धरणगाव : प्रतिनिधी
वडिलांकडून प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी करून विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या १० जणांविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात नूरजहा जाबीर देशपांडे (वय २६, रा. एस.पी. बेकरी जवळ धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मी २०२१ रोजी खोटे आरोप लावून रात्रभर मारहान केली. तसेच मुलीसोबत घरा बाहेर काढले. त्यावेळेस धमकावून सांगितले की, तू तुझ्या वडिलांकडुन प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख घेवून ये, असे सांगून मला ‘हम भिकारी की पोर कर के फस गये है’. आम्ही दुस-या ठिकाणी लग्न केले असते तर आम्हाला चांगला हुंडा मिळाला असता, असे वेळोवेळी बोलून अपमानित करित होते. तसेच घरातून हाकलून देत होते. त्यामुळे मी मागील ३ वर्षा पासून माझ्या मुलीसोबत माझ्या माहेरी धरणगाव येथे राहत आहे. परंतू मी महीला दक्षता विभाग येथे तक्रार केली असून त्यांनी मला पत्रादवारे धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार जाबीर गफ्फार देशपांडे, गफ्फार रसून देशपांडे, आमिना गफ्फार देशपांडे, इक्बाल गफ्फार देशपांडे, सुरय्या इक्बाल देशपांडे, समीर गफ्फार देशपांडे , साबीर गफ्फार देशपांडे, बशीर रसूल देशपांडे, नफिसा पटेल, फारुख देशमुख (१ ते ९ रा पाळधी खुर्द ता.धरणगाव) तसेच १० न फतेमा नगर जळगाव) यांच्याविरुद्ध माझी तक्रार असल्याचे पिडीत विवाहितेने म्हटले आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.अरुण निकुंभ हे करीत आहेत.