जळगाव : प्रतिनिधी
सरकारी नोकरीचे आमिष देऊन फसविल्याची घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. आरोग्य विभाग, रेल्वेत नोकरी लावून देण्याची थाप एका ठगबाजानं मारली. त्यासाठी वेळोवेळी ४ लाख ४० हजार लाख रुपये उकळले. भूषण शरद पाटील (रा.खाजोळा ता.पाचोरा) असं त्या ठगबाजाचं नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, प्रदीप चीतामन ससाणे (वय ५५) यांना भूषण पाटील याने त्यांचा मुलगा आणि भाच्याला आरोग्य विभागात आरोग्य सेवक, रेल्वे , म्हाडा, वाहन चालक, रेल्वे ग्रुप डी, अशा विभागमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. भूषण पाटील याने प्रदीप ससाणे यांच्याकडून डिसेंबर २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत रोख रक्कम १,३,०००/- तसेच त्यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँक कजगाव यांचे खाते व अक्सीस बँक पाचोरा स्वामी एजन्सी अशा खात्यांमधून भूषण पाटील याच्या मागणी प्रमाणे वेळोवेळी ३,३७,००० असे एकूण ४,४०,००० रुपये दिले होते. परंतू मुले व भाच्यांना कोणतीही ऑर्डर दिली नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ससाणे यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार केली. पुढील तपास सपोनि किशोर पवार हे करीत आहेत.