Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार
    क्राईम

    वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार

    editor deskBy editor deskAugust 19, 2022Updated:August 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    शहरात बँकेच्या कामानिमित्त आलेल्या पिलखोड येथील ८० वर्षीय वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बसस्थानकात घडली हाेती. याप्रकरणी गुरुवारी बस चालकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

    तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (वय ८०) ह्या बुधवारी दुपारी बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सायंकाळी येथील बस स्थानकावर आल्या. त्यावेळी औरंगाबाद-धुळे या धुळे आगाराच्या बसने (एमएच १४ बीटी २३५२) त्यांना जोरदार धडक दिली तसेच त्यांच्या डाेक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वृद्धेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी वृद्धेचा नातू शांताराम पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात बसचालक सुनील लक्ष्मण बिडगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पाेलिस हवालदार अजय मालचे करत अाहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.