Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ संशयास्पद बोटीचा मालक कोण?, फडणवीसांनी सभागृहात दिली धक्कादायक माहिती
    राजकारण

    ‘त्या’ संशयास्पद बोटीचा मालक कोण?, फडणवीसांनी सभागृहात दिली धक्कादायक माहिती

    editor deskBy editor deskAugust 18, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आलेली ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

    मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे राज्याला जास्त धोका हा समुद्रमार्गी असल्याने कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येत आहे. तसेच राज्यात आज सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काही तासांपूर्वीच ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. त्यामध्ये एके-४७ रायफल्स आणि काडतुसं सापडली होती. त्यामुळे हरिहरेश्वरच्या समुद्रात सापडलेल्या बोटीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सगळ्याचे पडसाद विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी त्यांनी कोकणातील समुद्रात सापडलेल्या या बोटीची इत्यंभूत माहिती सभागृहाला दिली.
    या बोटीचे नाव लेरिहान असून ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची होती. महिलेचे पती जेम्स हार्बर्ट या बोटीचे कप्तान होते. ही बोट मस्कतहून युरोपच्या दिशेने जात होती. मात्र, २६ जून रोजी सकाळी १० वाजता ही बोट समुद्रात भरकटली होती. त्यानंतर बोटीवरील खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यावेळी एका कोरियन युद्धनौकेने या बोटीवरील खलाशांची सुटका केली व त्यांना ओमानच्या स्वाधीन केले होते. परंतु, तेव्हा समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नव्हते. त्यानंतर समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली, अशी माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
    सध्या राज्यात सणासुदीचे वातावरण असल्याने ही बोट सापडल्यानंतर पोलीस आणि अन्य घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस आणि दहशतवादविरोधी पथक (ATS) या सगळ्याचा तपास करत आहेत. माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षेत कुठलीही कमतरता राहू नये, यादृष्टीने शहरांमध्ये नाकाबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सणांचे दिवस असल्याने कुठलीही विपरीत घटना घडणार नाही, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही सातत्याने केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गावकुसाबाहेर डिजिटल पाऊल; पंचायतींसाठी ‘पंचम’ चॅटबॉट लाँच

    January 25, 2026

    पद्मश्री जाहीर: महाराष्ट्राच्या भूमीतील कर्तृत्वाचा राष्ट्रीय सन्मान

    January 25, 2026

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.