• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्री तानाजी सावंत यांच्या ‘त्या’ शब्दामुळे सभागृहात गदारोळ !

अजित पवारांच्या फटकेबाजीत दुसऱ्याच दिवशी 'क्लीन बोल्ड'

editor desk by editor desk
August 18, 2022
in Uncategorized
0
मंत्री तानाजी सावंत यांच्या ‘त्या’ शब्दामुळे सभागृहात गदारोळ !

मुंबई : वृत्तसंस्था

पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्य सरकारमधील मंत्री आमने-सामने आले. यावेळी अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळेही सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला.

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र यानंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या एकूण जागा, रिक्त जागा आणि भरलेल्या जागा याची माहिती द्या, असा प्रश्न विचारला.

अजित पवारांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या तानाजी सावंत यांच्याकडे माहिती नव्हती आणि तारांबळ उडाली. अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासात माहिती मिळेल असं कळवल्यानंतर अर्ध्या तासात माहिती देण्याचं आश्वासन तानाजी सावंत यांनी दिलं. परंतु अर्ध्या तासात माहिती मिळणं शक्य दिसत नाही, असं म्हणत विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी माहिती द्या असं कळवलं आहे.

‘फेमस’वरून शिवसेना आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये खडाजंगी
बीड तालुक्यातील बक्करवाडी येथील एका महिलेचा अवैध गर्भपातामुळे झालेला मृत्यू या प्रश्नावर उत्तर देताना सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटातल्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा हा फेमस आहे, असं उत्तर तानाजी सावंत यांनी दिलं, पण फेमस म्हणजे लोकप्रिय या शब्दावर ठाकरे गटातले आमदार सुनिल प्रभू यांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर सावंतांच्या मदतीला मंत्री शंभूराज देसाईही उठले. मात्र अजित पवार यांनी यात हस्तक्षेप करत फेमस हा शब्द बीड जिल्ह्याचा अपमान करणारा असून तो कामकाजातून वगळण्यात यावा अशी सूचना केली. या सूचनेचा विचार केला जाईल, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिलं आहे.

Previous Post

धरणगाव शहरातील क्षत्रिय खत्री‎ समाजातर्फे धानपंचमी उत्सव साजरा‎

Next Post

‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’…मंत्री गुलाबराव पाटलांवर नीलम गोऱ्हे भडकल्या !

Next Post
‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’…मंत्री गुलाबराव पाटलांवर नीलम गोऱ्हे भडकल्या !

'तुम्ही मंत्री असाल तर घरी'...मंत्री गुलाबराव पाटलांवर नीलम गोऱ्हे भडकल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group