Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विटनेर गावातून पशूधनाची चोरी; एमआयडीसी पोलीसांचे दुर्लक्ष
    क्राईम

    विटनेर गावातून पशूधनाची चोरी; एमआयडीसी पोलीसांचे दुर्लक्ष

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 17, 2022Updated:August 17, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील विटनेर गावातून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पशूधनाची चोरी केल्याची घटना सकाळी उघडकीला आली आहे. याबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

    याबाबत अधिक माहिती अशी , एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीच्या अतंर्गत असलेल्या जळगाव तालुक्यातील विटनरे गावातून मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते२.३० वाजेच्या सुमारास गुरांची चोरी झाली. हा प्रकार बुधवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीला आला. गेल्या अनेक दिवसांपासून विटनेगा गावासह म्हसावद पोलीस दुरक्षेत्र हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

    विटनेर गावातील भवानी नगरात राहणारे सेवानिवृत्त पोस्टमन सुभाष गिरीधर जाधव यांच्या मालकीचे दोन गुरे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार होत असलेल्या चोऱ्यामुळे शेतकऱ्यांसह गावकरी कमालीचे धस्तावले आहे. या घटनेबाबत पोलीसात अद्याप कोणतीही नोंद किंवा तक्रार देण्यात आली नसल्याचे समजते. दरम्यान पोलीस पाटील डॉ. गुजाळ यांच्याशी संपर्क साधला असता लवकरच पोलीसात तक्रार देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.