धरणगाव (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १७ रोजी धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 75 फुटी तिरंगा ध्वजा जवळ सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आयोजन करण्यात आलेले होते.
शासन निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आलेले होते.त्यानुसार शहरातील सर्व शाळा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या. १०.५८ मिनिटांनी नगरपरिषदेने सायरन वाजवून ठीक ११.०० वाजता सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी धरणगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,सर्व शासकीय विभागांचे अधिकारी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विध्यार्थी – विद्यार्थिनी, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी – व्यावसायिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे मुकादम व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर सर्व शाळांचे सहकार्य लाभले. सदर कार्मक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर.विद्यालयाचे परदेशी सर यांनी केले.