जळगाव ;- डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आजपासून विविध विभागातील कामांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेे. यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी परिसर संचालक डॉ.सुधाकर पाटील, प्राचार्य डॉ.पूनमचंद सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, अतुल बोंडे, प्रा. शीतल पाटील, प्रा. ललित जावळे तसेच कार्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी देवेंद्र भंगाळे, माधुरी पाटील, मिलिंद तायडे, वाणी यांच्यासह कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक व सहाय्यक हे उपस्थित होते. यामध्ये शालेय कामकाजातील प्रवेश प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रोसेस, पात्रता प्रक्रिया, स्कॉलरशिप, परीक्षा विभाग व इतर कामे या संबंधित सखोल मार्गदर्शन त्या त्या विभागातील तज्ञ व्यक्तींकडून केले जाणार आहे.