जळगाव प्रतिनिधी | भुसावळ शहरातील सातारा चौकातील रस्त्याची अत्यंत बेकार अवस्था झाली आहे. या ठिकाणी प्रचंड खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन काढण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकरिता धिरज पाटील यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे तात्कळ रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
जामनेर रोडवरून जळगाव रोडवर येण्यासाठी जुना सातारा मुख्य चौकातून वाहतूक होत आहे. भुसावळातील हंबर्डीकर चौक ते लोखंडी ब्रिज रस्ता काँक्रिटीकरण कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सतत चालू असलेला वाहतूक मार्ग यावल, रावेरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने या रस्ते निकामी झाले. सर्व प्रकारची अवजड वाहनेसुद्धा याच चौकातून वाहतूक करीत आहे.
रस्तेवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यात पाणी साचून नाहक आजार प्रसरत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा मजबुतीकरण करण्याची मागणी प्रा. धिरज पाटील यांनी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे करण्यात आहे. मोठा अपघातात होण्यापूर्वी सावधान केले जात आहे.