मुबई : वृत्तसंस्था
एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून तीन दिवस आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.