महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळाले. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत.
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, वादग्रस्त नेते, आमदार, निर्णयांना दिलेली स्थगिती, ओल्या दुष्काळाची मागणी अशा सगळ्या कारणांमुळे यंदाचं अधिवेशन वाद होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनासाठी विधिमंडळात दाखल झाले आहेत. विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे येणार नसल्याच्या चर्चांदरम्यान त्यांनी विधिमंडळात हजेरी लावली आहे.
आजपासून पावसाळी अधिवेशनात खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला दिसून आलंय, असा टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यासोबत शिंदे गटात निष्ठेला कुठेही स्थान नाही. सरकारला जनतेचा आवाज ऐकू येत नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. ज्यांना सर्व दिले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. तिथे जाऊन आमदार फसलेले आहेत. अजूनही सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत..जर यायचे तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा असा हल्लाबोल केला आहे.