शिवसेनेतून बंड करून आल्यानंतरही महत्त्वाचे खाते न मिळाल्याने या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.मनाजोगे खाते न मिळाल्याने शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यावरून विरोधकांनी शिंद-फडणवीस सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही या नाराज असलेल्या मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. आजकाल बायको जेवढी फुगत नसेल तेवढे मंत्री फुगत आहेत. हे हस्यास्पद आहे, अशी खिल्ली सुप्रिया सुळे यांनी उडवली आहे. अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र, सध्या शिंदे-भाजप यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत.मंत्रीपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे
आजकाल नेत्यांचे मोबाईल नॉटरीचेबल येत आहेत. नेत्यांचा फोन सदैव रिचेबल असायला हवा. तुमच्याकडे ही काय मोबाईल नॉट रिचेबलवाली पद्धत सुरू झाली आहे, असं मला आजकाल दिल्लीवाले विचारत असतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.आपल्या राज्याला हे हॉटेल पॉलिटिक्स परवडणारे नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन हॉटेलमधे बसायचे आणि राज्याला वाऱ्यावर सोडायचे हे आपल्याला परवडणारे नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.