मुबंई : वृत्तसंस्था
स्वत्र्यांच्या अमृत महोस्तवानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियानचे देशभर आयोजन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानंतर हर घर तिरंगा फडकवण्याचं अभियान भारतात राबवण्यात येतंय. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या अभियानाचं समर्थन केलंय. बॉलीवुड अभिनेता आमिर खानने देखील या अभियानाचं समर्थन करत त्याच्या राहत्या घरावर झेंडा फडकवलाय. आमिरची मुलगी ईरा खान आणि आमिर यांचा त्यांच्या बालकनीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आमिरच्या बाजूला भारतीय ध्वजही दिसतोय.
एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला जातोय तर दुसरीकडे आमिरच्या घरावरील तिरंग्यातून त्याचं देशप्रेम दिसून येतंय. त्यामुळे त्याचा हा फोटो बघून त्याचं सोशल मीडियावरही कौतुक केलं जातंय. शीख धर्मीय लोकांचा तसेच भारतीय सैन्यांचा आमिरने त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटातून अपमान केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलाय. दहा वर्षातील आमिरचा हा पहिलाच चित्रपट असा होता ज्याला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळालाय.
हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरूवात
माहितीसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्याचा व सोशल मीडिया अकाउंटवर तिरंग्याची प्रोफाईल ठेवत भारताचा अमृत मोहोत्सव साजरा करण्याचा आग्रह केलाय. त्याअंतर्ग हर घर तिरंगा अभियान भारतात आजपासून सुरू झालंय.