भर कार्यक्रमात चाकूने केले वार ; एक डोळा गमावण्याची शक्यता !
वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) भारतीय वंशाचे कादंबरीकार आणि लेखक सलमान रश्दी शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये एका व्याख्यानाच्या मंचावर असताना त्यांच्या मानेवर चाकूने सपासप वार केले. सध्या व्हेंटिलेटरवर असलेले सलमान यांना एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या हातातील नसा कापल्या गेल्या आहेत.
सलमान रश्दी यांची ओळख करुन दिल्यानंतर लगचेचच चाकूनं त्यांच्यावर वार करण्यात आले. सलमान रश्दी यांना ‘द सैटेनिक वर्सेस’ या पुस्तकाच्या लेखनावरुन जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला. चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये एका व्यक्तीने स्टेजवर चढून रश्दी यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर रश्दी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
शुक्रवारी सकाळी सलमान रश्दी सीएचक्यू २०२२ च्या कार्यक्रमातील व्याख्यानासाठी मंचावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्क पोलिसांनी याबाबत एका आरोपीनं हल्ला केल्याचं म्हटलं. सलमान रश्दी मंचावर व्याख्यान देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. सलमान रश्दी यांच्या गळ्यावर चाकूनं वार करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ हेलिकॉप्टरनं सलमान रश्दी यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
काही तासांच्या शस्त्रक्रियेनंतर, रश्दी व्हेंटिलेटरवर होते आणि शुक्रवारी संध्याकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून जगभरातील लेखक आणि राजकारण्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केल्यानंतर ते बोलू शकले नाहीत.सध्या व्हेंटिलेटरवर असलेले सलमान यांना एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या हातातील नसा कापल्या गेल्या आहेत. आणि त्यांच्या यकृताची या हल्ल्यात इजा पोहोचली आहे. त्यामुळ यकृताचे नुकसान झाले आहे.