जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका १८ वर्षीय तरुणीची बदनामी होईल असे नाव गोंदलेले दाखवून तिची बदनामी व विनयभंग केला. तर याचा जाब विचारला असता तरूणीसह तिच्या कुटुंबीयांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. यासंदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार. तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील अभय संभाजी वंजारी याने अंगातील शर्ट काढून त्याचे छातीवर पीडित मुलीचे नाव गोंदलेले दाखवले व असा फोटो स्टेटसवर ठेवून तिची बदनामी केली आणि विनयभंग केला. पिडीत तरूणीने याचा जाब विचारला पीडित तरूणीसह तिच्या आई-वडील, भाऊ यांना धमकी दिली. तसेच आपण मुलीवर प्रेम करतो तुझ्याकडून जे होईल ते करून घे, अशी धमकी दिली. यासंदर्भात पीडित मुलीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अभय संभाजी वंजारी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामदास कुंभार करीत आहे.