माणुसकीला काळीमा फासणारी घटना
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये घडली. नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला प्रसूती काळात आलं.आधार कार्ड नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयातून चक्क परत पाठवण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. महिलेला प्रसूतीसाठी नाकारणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते.
अर्चना सोळंके असं या गर्भवती महिलेचं नाव आहे. मंगळवारी ही घटना घडली यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात सदर महिला प्रसूती कळा सुरु झाल्या म्हणून दाखल झाली. पण आधार कार्ड नसल्यानं तिच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला. तसंच गरिबीमुळे या महिलेकडे पैसेही नव्हते. अत्यंत गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत असताना या महिलेला मदत करायची सोडून या महिलेला परत पाठवण्यात आले. सुदैवानं काही सजग सामाजिक कार्यकर्ते या महिलेच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.
अखेर या महिलेच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते धावून आले. त्यांनी तातडीन पैसे गोळा करुन तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं. लोढा रुग्णालयात या गरीब आणि संकटात सापडलेल्या महिलेची अखेर सुखरुप प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म ही दिली. पण घडलेल्या निंदनीय प्रकारावर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय.गरीब महिलेला प्रसूतीसाठी नाकारणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील सरकारी डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.