लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशातील सर्वांत जुन्या पक्षाच्या नव्या प्रमुखाची निवड करण्यात येणार आहे. अद्याप खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक २१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मानहानिकारक पराभवानंतर राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अनेक दिवसांपासून गैर-गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू होती. काही कारणास्तव यात बराच काळ लागल्याने अनेक चर्चा होत आहे.
काँग्रेस नेत्यांचा एक मोठा वर्ग गांधी कुटुंबाकडेच अध्यक्षपद देण्याच्या तयारीत आहे. गटबाजीने ग्रासलेल्या पक्षावर गांधी घराण्याचा एकत्रित प्रभाव असल्याचे नेत्यांनी व्यक्त केले.मार्चमध्येच सोनिया गांधी यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत राजीनामा देण्याची ऑफर दिली होती.