लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफ नुसार दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं किंबहुना आत्तापर्यंत आलेल्या १५ लाख हेक्टर शेतीच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवेसना-भाजप युतीनं विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नव्हती.एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. त्यापेक्षा दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांना फायदा होईल याकरता दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.