लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार शपथविधीचा पार पडला. यात जळगाव जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीची निवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी आता डबल इंजिन मिळाल्याने विकास वेगाने व्हायला हवा. असा टोला राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. मंत्रीमंडळ विस्तार मुहूर्त मिळाला आहे. या मंत्री मंडळात सहभागी झालेल्या मंत्रांचे आपण स्वागत करून आणि त्यांनी तातडीने विकास कामे हाती घेऊन जनतेच्या समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा ठेवू असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होवून कॅबिनेट मंत्री पदाच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या मंत्रीमंडळात जळगाव जिल्ह्यातील भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर खडसे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. निवडतर झाली मात्र पालकमंत्री कोण? यावरून वाद व्हायला नको आणि विकास थांबायला नको. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
दोन्ही मंत्र्यांच्या चांगल्या कामासाठी आपली भूमिका राहणार असणार आहे. गटाच्या आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले नाही . तुम्ही हिंदुत्वसाठी इकडे आला आहेत तर मंत्री पदाची अपेक्षा नसावी,अस शिंदे यांनी ठरवले दिसत आहे. गंभीर आरोप असलेले नेते हे भाजप नवीन राहिला नाही. आरोपाचे पुरावे समोर येत असताना देखील मंत्री केले जात आहे. एका अर्थाने ते इकडे आले आणि स्वच्छ झाले असा हा या सरकारचा पारदर्शी प्रकार असल्याची टीका खडसे यांनी केली आहे
_________________