लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एका नऊ वर्षाच्या मुलीवर तिच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शारिरिक अत्याचार कर लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींला बेड्या ठोकल्या आहेत.
अल्पवयीन पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा गैरफायदा घेत ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील (५६) आरोपीने पीडितेची वाट अडवून राहत्या घराच्या पाठीमागे नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिच्यावर शारिरिक, लैंगिक अत्याचार केले. ‘जर तु तुझ्या आईला सांगितला तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी दिली आहे.
काही काळाने बालिकेला शारिरिक त्रास होऊ लागल्याने तिला उपचारार्थ दाखल केले असता शारिरिक, लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. त्वरित पिडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी संशयित पाटील यास बेड्या ठोकल्या आहेत.