राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पहिल्या टप्प्याच साधारणत: १५ ते १८ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोले बाजी केली आहे.
“उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे. मात्र, विरोधी पक्षनेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही”, विधानसभेच्या विरोधीपक्ष नेता या नात्याने मला आज पत्र मिळाले आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी विरोधीपक्षांची नावे देण्यासाठी हे पत्र मला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उद्या या समितीची बैठक होण्याची शक्यता आहे.
पुढे अजित पवार म्हणाले, मला मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र, विरोधीपक्ष नेता म्हणून मला अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही”. “गेल्या बऱ्याच दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. तो लवकर होईन, असचं सांगण्यात येत होत. मात्र, नुकताच त्यांना दिल्ली दौरा झाला आहे आणि आजही त्यांची बैठक झाली आहे. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते आहे.”, असेही ते म्हणाले.