राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन दीड महिना झाला तरीसुद्धा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. संपूर्ण राज्याचं लक्ष आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागून राहिलं आहे. आता प्रतिक्षा संपली असून उद्याच सकाळी 11 वाजता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही कळतंय. पहिल्या टप्प्यात 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक सुरु असून बैठकीनंतर ते राजभवनावर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात किती मंत्र्यांचा समावेश असेल हा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे असणार आहे. सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विचारला. मात्र लवकरच विस्तार होईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून देण्यात येत होते. सामान्य जनतेचे प्रश्न आता सुटणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरील महत्त्वाची बैठक नंदनवन या बंगल्यावर झाली. यानंतर हे दोघेही काही वेळातच राज्यपालांची भेट घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उद्या पहिल्या टप्प्यात 20 ते 25 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्यातील भाजप आणि शिंदे सेनेतील काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ज्या आमदारांना संधी मिळणार आहे, ते मुंबईला रवाना झाले आहे. अहमदनगरमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि औरंगाबादेतून संजय शिरसाट मुंबईला निघाले आहे.