बेळगावहून हिरेकेरूरला निघालेली कर्नाटक महामंडळाची बस अचानक पलटी झाल्याने अपघात घडला आहे. बसमध्ये असलेल्या 35 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले. बस सावकाश असल्या कारणाने प्रवाशांना फारशी इजा झाली नाही.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बडेकोळ्ळमठ येथे रविवारी बसचा अपघात घडला. बागेवाडी विशाळगडहून राणेबेन्नूर निघालेली बस बेळगावात थांबा घेऊन पुढे जात होती. बडेकोळ्ळमठाच्या पुढील बाजूला असलेल्या कमकारहट्टीच्या बाजूला उतारीला लागलेल्या बसवरील चालकाचा नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. याचवेळी जोराचा पाऊस सुरू असल्याने चालकाने वेग कमी केला होता. तरीही बस बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि पलटी झाली.
बसमध्ये बसलेले पाच प्रवाशी जखमी झाले. उर्वरित प्रवाशांनाही कसलीही इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तरीही पोलिसांनी पोकलँड मागवून ही बस येथून हटवण्यात आली. किरकोळ जखमी पाच जणांवर उपचार करून सोडून दिले. रात्री उशिरापर्यंत याची पोलिसांत नोंद झाली नव्हती. पोलिस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर तपास करीत आहेत.