मुंबईविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यभरातून अनेक पिकाचा सामना करावा लागतो. उगाच बाष्कळ बडबड करू नका, सेल्फ गोल करू नका अशा शब्दांत वरिष्ठांकडून कोश्यारींना समज देण्यात आली आहे. आता अक्षरशः राज्यपाल कोश्यारी नजर चोरात पळ काढण्याची वेळ आली आहे.
गुजराती आणि मारवाडी लोक निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राज्यपाल दोन दिवस दिल्ली दौऱयावर असून त्यांनी आज पक्षातील वरिष्ठांची भेट घेतली. तेव्हा त्यांना वरिष्ठांनी चांगलीच तंबी दिल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे राज्यपालांनीही तशी कबुली दिली.
महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी ‘चालता चालता’ बोलताना कोश्यारी म्हणाले, मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत.महाराष्ट्राची माफीही मागितली. मात्र तरीही महाराष्ट्रातील संतापाची लाट ओसरलेली नाही.पक्षातून चांगलाच दम भरला गेला आहे. ही ‘समज’ ऐकून राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्र सदनात आले, पण पत्रकारांना पाहताच त्यांनी फक्त नमस्कार केला आणि ‘सीएम यहाँ पर है वो आप से बात कर लेंगे, गव्हर्नर को बोलना नहीं है।’ असे म्हणत अक्षरशः पळ काढला. त्यामुळे राज्यातील अनेक पिकाचा भडिमार सुरू झाला आहे.