लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे गट आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना आणि शिंदे गटात वादप्रतिवाद आणखी वाढले आहेत. पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर शिंदे गटाची बाजू घेत शिवसेनेच्या टीकांना प्रत्युत्तर दिले. अनेक गौप्यस्फोटानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
केसरकर यांनी अनेक खुलासे केले होते. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा कट नारायण राणे यांनी आखल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला. याविरोधात आपण भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडे तक्रारही केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या आरोपानंतर नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. किरण पावसकर शिंदे गटाची बाजू मांडणार असल्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीनआस्मानचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा मागे नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं केसरकर यांनी म्हटलं होतं.