लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मयूर कॉलनी परिसरातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एकावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर कॉलनी परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुलगी ही घरात असताना संशयित आरोपी सागर भरत भोई रा. जळगाव याने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचे घटनाउघडकीला आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सागर भरत भोई याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.