लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत.राज्यात शिवसेना आणि भाजप सरकारचा होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. त्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.
30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.मंत्रिमंडळ स्थापन न झाल्याने त्याचा परिणाम आता विभागांवर होत आहे.त्यामुळे,मंत्र्यांचे सर्व अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्र्यांकडे अनेक प्रकारचे अधिकार असतात. पण राज्यत मंत्रीच नसल्याने विविध विभागांची कामे अडली आहेत. मंत्रीच नसल्याने हे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिवांकडे सोपवण्यात आले आहेत.
गृह, महसूल, नगरविकास या विभागांमध्ये अनेक प्रकारची अपीले प्रलंबित असतात. अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, ग्रामविकास, शिक्षण खात्यांकडे नागरिकांशी संबंधित किंवा सावर्जनिक संस्थाशी संबंधित अपिलांवर सुनावणी होत असते. 35 दिवसांपासून त्या संबंधीची प्रक्रिया अडलेली होती. अडू नयेत म्हणून मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.