धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथील तलाठी दत्तात्रय पाटील यांची मुलगी प्राजक्ता हिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त जुवार्डी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जुवार्डी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमी परिसरात चिकू, सिताफळ, जांभूळ, मोसंबी यांचे एकुण २५ पर्यावरण पुरक झाडे लावण्यात आले. गेल्यावर्षी याच परिसरात २० झाले लावण्यात आले होते. त्यापैकी १५ झाडांचे संगोपन वृक्षमित्र भालेराव पाटील करीत आहे. वृक्षारोपण करून नवीन कार्यास प्रारंभ केल्याने सर्वत्र उपक्रमाचे कौतूक होत आहे.