• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 5, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअनुषंगाने मान्यवरांच्या उपस्थितीत महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

एकूण ६०० विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांनी वितरित केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतही व्यक्त केले.

गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली होती. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जैन उद्योग समूहाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, डिगंबर महाले, उद्योजक सागर चौबे, करणी सेनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण सपकाळे, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष कमलेश देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी, संजय चौधरी, भूषण महाजन, विलास ताटे, प्रमोद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

लाचलुचपत पथकाचा सुगावा लागताच नेरी येथील वीज कंपनीचा सहाय्यक अभियंता पसार

Next Post

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात राखी प्रात्यक्षिक कार्यशाळा

Next Post
मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात राखी प्रात्यक्षिक कार्यशाळा

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात राखी प्रात्यक्षिक कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group