लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भगवे मफलर गळ्यात टाकून हल्ला केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आमदार व गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली असून. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली गेली
पडळकर हे वारंवार बिनबुडाचे आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाची बदनामी करत आहेत. याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही पोलिस आयुक्तांकडे निवेदनातून पक्षाकडे करण्यात आली आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अनेक वेळा जयंत पाटलांच्या वर जहरी टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, दीपाली धुमाळ, रवींद्र माळवदकर, वनराज आंदेकर यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकार्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. पडळकर यांचे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.