श्रावण महिन्यातील पहीला श्रावणी साेमवार. हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला’ आजच्या दिवशी विशेष महत्व प्राप्त होते. भारतातुन आज भाविक येथे दर्शनासाठी येतात. श्रावणी सोमवारला दिवसभर सुरु असलेल्या पूजा-अर्चेमुळे मंदिरातील वातावरण भक्तीमय आहे.
नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ‘श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात’. आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक, आरती अशा पूजाअर्चा सुरू असल्याने; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे. पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसुन आल्या. नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडील मंडपात एकाच वेळी दहा ते पंधरा हजार भाविक उभे राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र
भक्तांची गर्दी वाढल्याने तो मंडपही कमी पडल्याने, भाविकांच्या रांगा मंदिराच्या बाहेर पर्यंत लागल्या होत्या. भाविकांना दर्शनासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. तर पेड दर्शनासाठी, दोनशे रुपये देणाऱ्या भाविकांना देखील दर्शनासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागत आहे. त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी दुमदुमून गेली आहे. हजारोच्या संख्येने भाविकांची होणारी गर्दी बघता, नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.