धुळे प्रतिनिधी । जिल्ह्यातील तामसवाडी येथून विवाहिता ही चौदा वर्षाचा मुलाला सोबत घेवून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनगिर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनेश वसंत बोरसे (वय-४०) रा. तामसवाडी ता.जि.धुळे हे पत्नी सपनाबाई व मुलगा उदय यांच्यासोबत वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ जुलै रोजी दिनेश यांची पत्नी सपनाबाई बोरसे ह्या घरात कुणालाही काहीही न सांगता मुंबई येथे बचत गटचा मोर्चा असल्याने मुलगा उदय बोरसे याला सोबत घेवून गेल्या. त्यानंतर त्यांच्या पतीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता काहीही माहिती मिळाली नाही व मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी केली असता मुंबईत मोर्चा नसल्याचे कळाले. अखेर याबाबत दिनेश बोरसे यांनी सोनगीर पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सोनगीर पोलीस कर्मचारी करीत आहे.