मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी अजिबात शत्रू मानू नये. त्या माणसांनं उरावर धोंडा ठेवून हा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या विरोधात बंड करायला तयार नव्हते. एकनाथ शिंदे कितीवेळा रडलं. शहाजी पाटील यांनी एका मुलाखतीत आमदार हा दावा केला आहे. निर्णय घेण्यासाठी आम्ही ४० ते ४२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मोठ दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी ही निर्णय घेतला, असे आमदार पाटील यांनी या वेळी नमूद केले.
शिवसेना ताब्यात घेण्याबाबतच्या वादावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात चालेला वाद दुर्दैवी आहे. बहुधा एकनाथ शिंदे हा निर्णय घेण्यासाठी तयार होत नव्हते, सूरतमध्ये , गुवाहाटीमध्ये रडलं. काय बोलतं नव्हते. पण, ‘निर्णय घ्या नाही तर तुम्हालाही सोडून आम्ही निघाले,’ अशी हट्टाची भूमिका आम्ही घेतली होती. आम्ही शिंदेंनाही सोडलं असतं, पण आम्ही शिवसेनेत थांबत नव्हतो. शिवसेनेत आम्ही मरायला लागलो होतो. काय करता शिवसेनेत राहून, असा प्रश्न उपस्थित करत मोठा गौप्यस्फोट केला, शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला.
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असा माणदेशी भाषेतील माझा संवाद एवढा गाजेल असे मलाही वाटलं नव्हतं. खासदार संजय राऊत, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या संवादाबाबत सातत्याने बोलताना दिसून येत आहे. संजय राऊतांनी त्यावर बोलणं, त्यांचं मला काही वाईट वाटत नाही. अशा खोचकपणे टिका करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सुनावले.