जळगाव प्रतिनिधी तुम्ही इंस्टाग्रामचा वापरात असाल तर सावधान. मुंबई आणि इतर परिसरातून २२ हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करत होता. अनेक तक्रार आल्याने आरोपींचा तपास घेऊन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
महिलिचा लैंगिक छळ आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली महाराष्ट्र पोलिसांनी गुजरातमधील गांधीनगर येथून प्रशांत आदित्य असे एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपी इन्स्टाग्रामवरून महिलांचे फोटो काढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवायचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलांकडे पैशांची मागणी करत असे . आतापर्यंत त्याने सुमारे २२ महिलांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे. महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने आतापर्यंत ४९ महिलांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहे.
प्रशांत हा सोशल मीडियावरून पीडित महिलांचे फोटो काढायचा आणि नंतर त्यात काही अश्लील क्लिप जोडायचा. यानंतर तो त्या क्लिप त्या महिलांना पाठवायचा. व्हिडिओ काढण्यासाठी तो महिलांकडे पैशांची मागणी करायचा. महिलांना त्यांचे कथित अश्लील व्हिडिओ डिलीट करण्यासाठी ५०० ते ४ हजार रुपये मागायचा. लगेच पैसे दिल्यास फक्त ५०० रुपये लागतील, दुसऱ्या दिवशी दिले तर दुप्पट पैसे द्यावे लागतील, असं म्हणत तो ब्लॅकमेल करायचा. १४ जुलै रोजी सुमारे २२ महिलांनी मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाण्यात येऊन तरुण अश्लील व्हिडीओ बनवून पैसे मागून त्रास देत असल्याची तक्रार होती. यातील बहुतांश व्हिडिओ ३० सेकंदांचे होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध महिलांची विनयभंग, लैंगिक छळ, खंडणी आणि आयटी कायद्याच्या कलम ६७ अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.