जळगाव;- शहरातील वसंतस्मृती भाजपा कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत येत्या आगामी निवडणूका जिल्हा बँक, दूध संघ, नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती जळगाव जिल्ह्यात माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी समारोप प्रसंगी सांगितले.
या बैठकीत मा. डॉ. राजेंद्र फडके व माजी आ. स्मिताताई वाघ यांनी संघटनात्मक विषयात मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संघटनात्मक आढावा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी केले व जिल्हा परिषदेच्या सूचना जिल्हा सरचिटणीस मधुभाऊ काटे यांनी केल्या. आभार जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील यांनी केले.
या बैठकीला आ. मंगेश चव्हाण, जिल्हा परीषद अध्यक्षा ना. रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती ज्योती राकेश पाटील, उज्वलाताई म्हाडके, जयपाल बोदर्डे, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य उपस्थिती होते.