गोव्यातील एका रेस्टॉरंट आणि बारसंदर्भात भाजपच्या स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर अनेक ट्विट्स करण्यात आले होते. काँग्रेसच्या तीन नेत्यांना २४ तासांच्या आत ट्विट हटवण्याचे आदेश आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यावरील आरोपांवर दिल्ली उच्च न्यायालयानेही नेत्यांना समन्स बजावले.
जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसूझा यांना स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात त्यांचे ट्विट हटवून 18 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास आदेश दिले आहे. अद्याप असे केले नाही उच्च न्यायालयाने म्हटले, तर सोशल मीडिया कंपनी किंवा ट्विटरला ट्विट काढून टाकावे लागतील.”माझी मुलगी १८ वर्षांची असून, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. ती बार चालवत नाही. राजकारणात नाही,” असे सांगत, आपल्या मुलीवर खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेसला आपण न्यायालयात आणि जनतेच्या दरबारात जाऊनच धडा शिकवू अस मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं होतं. तसेच माझ्या मुलीचा दोष एवढाच की, ज्या महिलेने गांधी घराण्याच्या ५००० कोटींच्या भ्रष्टाचारावर पत्रकार परिषद घेतली तिची ती मुलगी आहे, असेही इराणी यांनी म्हटलं.
यावरच काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिउत्तर दिले, दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला स्मृती इराणींनी दाखल केलेल्या खटल्यासंदर्भात औपचारिकपणे उत्तर देण्यास सांगितले आहे. आम्ही न्यायालयासमोर तथ्ये मांडण्यास उत्सुक आहोत. आम्ही इराणींच्या खटल्याला प्रत्युत्तर देऊ आणि ते खोटे ठरवू, असं जयराम रमेश कोर्टाच्या आदेशानंतर ट्विट करून म्हटलं.